Sharad Pawar On Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंच्या ‘जनता जमालगोटा देईल’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती भाषा...'

Sharad Pawar Latest News: मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ती भाषा त्यांनाच शोभते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
sharad pawar and eknath shinde
sharad pawar and eknath shinde saam tv

अक्षय बडवे

Sharad Pawar News: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकारण पेटलं आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याने यावर 'जनता जमालगोटा देईल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ती भाषा त्यांनाच शोभते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

या उद्घाटन सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, 'मी त्या ठिकाणी गेलो नाही याचं समाधान आहे. जे कर्मकांड सुरू होतं, त्याच्यावरून असं दिसतंय की नेहरू यांनी आधुनिक लोकशाहीची जी संकल्पना मांडली. पण या कार्यक्रमावरून देश मागे गेला आहे'.

sharad pawar and eknath shinde
Narendra Modi Speech On New Parliament Building: नवीन संसद भवन भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नाचं प्रतिबिंब - PM नरेंद्र मोदी

'राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना बोलावलं पाहिजे होतं. त्यांच्या भाषणातून अधिवेशन सुरू होत असते. राज्यसभेचा मी सदस्य आहे. त्याचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. त्यांची उपस्थिती दिसली नाही. हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता की काय, असं वाटतं आहे, असे शरद पवार म्हणाले.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, 'ती भाषा त्यांनाच शोभते. त्यावर बोलणे उचित नाही'.

sharad pawar and eknath shinde
Rahul Gandhi On Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, मोदींवर निशाणा साधत म्हणाले...

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यावर शिंदे यांनी कडाडून टीकास्त्र सोडलं होतं. शिंदे म्हणाले होते, 'काही लोक विघ्नसंतोषी असून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध करणं म्हणजे लोकशाहीचा विरोध आहे. विरोधकांना पोटदुखी सुटली आहे . सुज्ञ जनता ही पोटदुखी चांगला जमालगोटा देऊन दूर करेल. मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठं ही अळणी लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणंतही काम केलं तरी विरोधक त्याला विरोध करून वातावरण निर्मिती करतात'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com