CM शिंदेंच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसतात? फोटो ट्विट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहे. हा फोटो ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
Eknath Shinde Srikant Shinde Viral Photo
Eknath Shinde Srikant Shinde Viral PhotoTwitter

Eknath Shinde Srikant Shinde Viral Photo : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगताना दिसतो आहे. विविध मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण, खासदार श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Srikanth Shinde News Today)

Eknath Shinde Srikant Shinde Viral Photo
School : राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा लवकरच बंद होणार? शिक्षण विभागाने मागवली माहिती

या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहे. हा फोटो ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर'? असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. रविकांत वरपे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 'हा फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. असं दिसतं आहे. आम्ही त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत' अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, फोटो व्हायरल होताच विरोधकांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com