KDMC आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात; राष्ट्रवादीची टीका

KDMC चे आयुक्त शिवसेनेचे काम करत आहेत की नागरिकांचे काम करत आहेत? असा सवाल करत आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात अशी टीका राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केली आहे.
KDMC आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात; राष्ट्रवादीची टीका
KDMC आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात; राष्ट्रवादीची टीका प्रदीप भणगे

डोंबिवली :  KDMC चे आयुक्त शिवसेनेचे काम करत आहेत की नागरिकांचे काम करत आहेत? असा सवाल करत आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात अशी टीका राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केली आहे.

कल्याण शीळ रोडवर काँक्रीटीकरणचे काम चालू आहे.मात्र अनेक ठिकाणी काम अर्धवट झाल्याचे दिसून येते.कल्याण-शीळ रोडवरील गोळवली गाव येथे सहा महिन्यांपासून खड्डा खोदून आहे.त्यामुळे गावात पावसाचे पाणी साचत आहे आणि अपघात सुद्धा होत आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने महापालिकेच्या विरोधात बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी 'ऑलम्पिक मध्ये जर खराब रस्त्यांची स्पर्धा असती तर.' असा आशय असलेले फलक लावत पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा -

कल्याण-शीळ रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू असून गोळवली गावाजवळ हे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. अर्धवट कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी एमएसआरडीसी कडे केली आहे. याठिकाणी पाण्याची पाईपलाईन असून कल्याण डोंबिवली पालिकेने पाण्याच्या लाईन खाली केल्यास हे काम पूर्ण करण्यात येईल असे उत्तर एमएसआरडीसी कडून देण्यात आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

KDMC आयुक्त महापालिकेतून शिवसेनेची शाखा चालवतात; राष्ट्रवादीची टीका
आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील 'पेंग्विन' पुन्हा एकदा वादात, होतोय कोट्यवधी खर्च!

याप्रकरणी एमआयडीसी व पालिका पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत असून पावसाळ्यात यामध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहे. येथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसत आहे. गेल्या वर्षभरापासून या परिसरातील नागरिक त्रस्त असून अखेर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हा फलक लावला असल्याचे सुधीर पाटील यांनी सांगितले आहे.

महापालिका प्रशासनाविरोधात फलकांची सिरीजच आम्ही करणार आहोत. पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे पालिकेत बसून शिवसेनेची शाखा चालवित आहेत अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. आयुक्त सेनेचे काम करतात की सर्वसामान्य जनतेचे हेच कळत नाही. झोपलेले प्रशासन जागे न झाल्यास रस्त्यावर उतरून आयुक्तांना घेराव घालीत ऑलम्पिक चे विजेते पदक त्यांच्या गळ्यात घालू असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com