Navale Bridge News: सावधान! पुढे नवले पूल आहे...; पुण्यात राष्ट्रवादीने लावलेल्या फ्लेक्सची चर्चा

Navale Bridge Flex In Pune: नवले ब्रिजवर होणारे सततचे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने आता नवीन शक्कल लढवली आहे.
Navale Bridge Flex
Navale Bridge Flexसचिन जाधव

सचिन जाधव, पुणे

Navale Bridge News: पुण्यातील नवले पुलावर गेल्या दोन दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. दिवसेंदिवस नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रविवारी रात्री झालेल्या अपघातामध्ये ४८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिली. त्यानंतर त्याच रात्री देखील पुन्हा दोन अपघात झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) काँग्रेसकडून सेल्फी पॉइंट येथे 'सावधान! पुढे नवले पूल आहे' अशा आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. (Navale Bridge Flex)

Navale Bridge Flex
Burning Car Video: ठाण्यात बर्निंग कारचा थरार; चालत्या कारला लागलेल्या आगीत दोन रिक्षाही जळून खाक

या फ्लेक्सवर तीव्र स्वरूपाचा उतार आणि त्याबरोबरीने कावळ्याचा देखील फोटो दाखवण्यात आला आहे. यावर 'सावधान... पुढे नवले ब्रीज आहे' अशी सूचना लिहिली असून जांभुळवाडी तलावापासून ते नऱ्हे येथील सेल्फी पॉईंटपर्यंत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगू लागली.

Navale Bridge Flex
Pakistani Girl Ayesha: 'मेरा दिल ये पुकारे आजा...'; पाकिस्तानच्या आयेशाचे खऱ्या आयुष्यातले सुंदर Photos

अपघात रोखण्यासाठी लावण्यात आले नवीन रंब्लर

दरम्यान नवले ब्रिजवर (Navale Bridge Pune) होणारे सततचे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने आता नवीन शक्कल लढवली आहे. कात्रज नवीन बोगद्यापासूनच पुण्याकडे येणार्‍या वाहनांचा वेग तीव्र उतारामुळे प्रचंड असतो. हा वेग कमी करण्यासाठी नवीन बोगद्यापासून ३०० ते ३५० मीटर अंतरावर रंब्लर लावण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

ज्या ठिकाणी हे रंब्लर आता ४ इंचांचे आहेत, त्या ठिकाणी १० ते १२ इंच उंचीचे करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी 'एनएचएआय'च्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. नवले पूल परिसरात सातत्याने होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. त्यामध्ये प्रस्तावित केलेल्या उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com