बारामतीमध्ये पिकनिकपेक्षा निवडणूक लढून बघा; भाजपच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भाजपने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
Supriya Sule, Nirmala Sitaraman
Supriya Sule, Nirmala SitaramanSaam Tv

मुंबई: भाजपने आता लोकसभा निवडणुकांची (Election) तयारी सुरू केली आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या १२ ते १८ ऑगस्ट बारामती दौऱ्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे. या दौऱ्यात त्या बारामती येथील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर टीका केली आहे.

Supriya Sule, Nirmala Sitaraman
मराठी कविता ऐकवत सुप्रिया सुळेंचा महागाईवरुन हल्लाबोल; सगळ्यांनीच ऐकावं असं तुफान भाषण

तीन दिवस बारामती मध्ये येऊन पिकनिक करण्यापेक्षा बारामती लोकसभा निवडणूकचं एकदा लढून बघा...बारामतीवाले पार्सलचे पॅकिंग खूप छान करतात. काही अनुभव घेतलेले लोक भाजपमध्ये (BJP) आहे तर काही रासप, शिंदे गटात स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत, असं ट्विट राष्ट्रवादी युवकचे सुरज चव्हाण यांनी केले आहे.

Supriya Sule, Nirmala Sitaraman
जाळपोळीच्या घटनेनंतर मणिपूरमध्ये जातीय तणाव वाढला, ५ दिवस इंटरनेट बंद

मराठी कविता ऐकवत सुप्रिया सुळेंचा महागाईवरुन हल्लाबोल

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच सभागृहात गोंधळ सुरू झाला. आज सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब झाले. यानंतर लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दूध, ताक, पनीर यावरील लावलेल्या जीएसटीवरुन केंद्रावर टीका केली.

दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचं दही, दहीचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तुप यात आता दत्त गुरु आणि गाय दोन्ही सोडून तुम्ही सगळ्यांवर जीएसटी लावला आहे, अशी जोरदार टीका आज लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com