Ajit Pawar News: कोणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती आहे... असा झटका देणार दहा पिढ्या लक्षात ठेवतील; अजित पवारांचा बंडखाेरास इशारा

मी काही बोलणार नाही मात्र त्याला असा झटका देईल की त्याच्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील असा सज्जड दम दादांनी बंडखाेराला भरला.
Ajit Pawar News, Nagar Dcc Bank Election
Ajit Pawar News, Nagar Dcc Bank Electionsaam tv

- सुशिल थाेरात

Ahmednagar DCC Bank Election: नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (nagar dcc bank election) राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ncp leader ajit pawar) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अजित पवार यांनी त्यांच्या नगर जिल्हा दाैरा दरम्यान मात्र असली माणसं नकोतच असा थेट इशाराच बंडखाेरांना दिला आहे. (Maharashtra News)

Ajit Pawar News, Nagar Dcc Bank Election
Congress Party News : राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला माेदी घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

नगर जिल्ह्यातील कर्जत (Karjat) येथे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल वितरण सोहळ्यास अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी भाषणा दरम्यान अजित पवार यांनी फुटीर संचालकांचा आपल्या भाषा शैलीत चांगलाच समाचार घेतला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय घडलं काय नाही घडलं, कोणी त्या ठिकाणी शेण खाल्लं हे मला चांगलं माहिती असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. आज मी काही बोलणार नाही मात्र त्याला असा झटका देईल की त्याच्या दहा पिढ्या लक्षात ठेवतील असा सज्जड दम दादांनी बंडखाेराला भरला.

Ajit Pawar News, Nagar Dcc Bank Election
Beed News : दुध भेसळ प्रकरणातील राष्ट्रवादीच्या नेत्याचे वकीलपत्र घेणार नाही : आष्टी वकील संघाचा निर्णय

पुढं बाेलताना अजित पवार म्हणाले जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची होती. 14 लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे असताना चंद्रशेखर घुले सारखा माणूस तिथे पराभूत होतो अशी खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली.

दिवसा आमच्याबरोबर आणि मतदानाला त्यांच्याबरोबर असली अवलाद जर इथे असली तर काय खरं नाही असेही अजित पवारांनी म्हटलं. असली माणसे आम्हाला नको, तिकडे जावा दुसरीकडे कूठे मारायची तिकडे मारा मात्र असली माणसं आमच्याकडून नको असा खरमरीत समाचार अजित पवारांनी बंडखाेरांचा घेतला.

Ajit Pawar News, Nagar Dcc Bank Election
Bus Concession For Woman: महिलांसाठी गाेड बातमी : एसटी पाठाेपाठ खासगी बसमध्येही 50 टक्के सवलत जाहीर, कुठे जाणून घ्या

आम्ही गरिबांसमोर हात जोडू ते आपल्यासोबत विश्वासाने राहतील. गरीब शब्दाला पक्की असतात असा विश्वास देखील अजित पवार यांनी भाषणातून व्यक्त केला. दरम्यान अजित पवार यांच्या नगर दाै-याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com