... तोपर्यंत राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही, असं विधान भुजबळ यांनी केलं आहे.
... तोपर्यंत राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
uddhav thackeray and chhagan bhujbal Saam Tv

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जोपर्यंत राजीनामा देण्याची भूमिका घेत नाही, राजीनामा देत नाही. तोपर्यंत राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे, असं विधान भुजबळ यांनी केलं आहे. (Maharashtra Political Crisis News In Marathi )

uddhav thackeray and chhagan bhujbal
एकनाथ शिंदे यांना कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा ? शरद पवार म्हणाले...

छगन भुजबळ म्हणाले,'आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवटपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. संजय राऊत हे काय बोलले ही त्यांची भूमिका आहे. यापेक्षा उद्धव ठाकरे हे जोपर्यंत राजीनामा देण्याची भूमिका घेत नाही, राजीनामा देत नाही. तोपर्यंत राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आमदार पुन्हा निवडणून येत नाही. अनेक आमदारांची परत येण्याची इच्छा असं ऐकतोय'.

uddhav thackeray and chhagan bhujbal
महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील : शरद पवार

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीत महाराष्ट्राच्या राजकारणाची रणनीती आखली आहे. अशातच शिंदे गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखीनच ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. अडीच वर्ष महाविकास आघाडीने मोठे निर्णय घेतले आहेत. बंड करणे हे राजकीय अज्ञान आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआ (mva government) बहुमत सिद्ध करेल. ज्या आमदारांनी बंड केले आहे, त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पवार यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटाला दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com