महाराष्ट्रात गोंधळ झाल्याचा कांगावा करण्याची गरज नाही; जयंत पाटलांचा पटोलेंना टोला

' जबाबदार नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून बोलणे अपेक्षित असतं, ते दुखावले असतील पण पाठीत खंजीर खुपसला हे बोलणे संयुक्तिक नाही.'
Jayant Patil on Nana Patole, Jayant Patil Latest Marathi News, Nana Patole Latest Marathi News
Jayant Patil on Nana Patole, Jayant Patil Latest Marathi News, Nana Patole Latest Marathi NewsSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : भंडारा-गोंदीया येथे आघाडीबाबत चर्चा झाली होती मात्र, त्या चर्चेमध्ये काही झालं नाही. तसंच तेथील घडामोडींचे राज्यातील सरकारवर परिणाम होणार नाहीत. भाजपने (BJP) आमच्या नेत्यांवर कारवाई केली तरीही आमची भूमिका बदलली नाही. शिवाय या ठिकाणी जे काही झालं ते तिथल्या स्थानिक इश्युंमुळे झालं असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या (Bhandara Zilla Parishad) निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्रपक्षांमधील वादासंदर्भात बोलत होते. (Jayant Patil Latest Marathi News)

ते म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका एकला चलो ही नाही, तिन्ही पक्ष एकत्र राहावे ही आमची भूमिका कायम आहे. तसंच जबाबदार नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून बोलणे अपेक्षित असतं. ते दुखावले असतील पण पाठीत खंजीर खुपसला हे बोलणे संयुक्तिक नाही. येणाऱ्या काळात टोकाची भूमिका प्रत्येक पक्षाने टाळणे अपेक्षित आहे. गोंदिया जिल्ह्यात पटले नाही म्हणून महाराष्ट्रात गोंधळ झाला, असा कांगावा करायची गरज नाही. असा टोला पाटील यांनी नाना पटोलेंना (Nana Patole) लगावला.

ते पुढं म्हणाले, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत मतभेद नव्हते. गोंदियामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र बसण्यात अपयश आले आहे. पण सगळीकडे असंच होईल असं नाही. भाजप विरोधात सगळ्यात जास्त प्रखरपणे राष्ट्रवादी लढत आहे. राष्ट्रवादीने भाजपशी जमवून घेतल नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे देखील पाहा -

काल भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आलं आहे तर उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं. शिवाय या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसने युती केल्याच्या चर्चा सगळीकडे सुरु होत्या. मात्र, भंडारा जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस असून भाजपचे ६ सदस्य फुटून काँग्रेसमध्ये आले, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आम्ही भाजपकडे गेलो नव्हतो तेच आमच्याकडे आले शिवाय काँग्रेसने कोणत्याही प्रकारची युती आघाडी भाजपसोबत केली नसल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काल स्पष्ट केलं होतं. मात्र याचवेळी काँग्रेसने नव्हे तर राष्ट्रवादीनेच भाजपसोबत युती केली असल्याचं लोंढे म्हणाले होते तर भंडारा-गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याते वक्तव्य नाना पटोले यांनी काल केलं होतं या सर्व पार्श्वभूमिवर आज जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका व्यक्त केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com