पत्रा चाळ प्रकरणात शरद पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

भातखळकरांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya sule
Supriya sule Saam Tv

रुपाली बडवे

Supriya Sule News : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय या घोटाळा प्रकरणी पवारांची (Sharad Pawar) देखील चौकशी करण्यात यावी असं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलं आहे. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya sule
Supriya Sule On Bhatkhalkar : "ईडीची कागदपत्रं लीक होत आहेत का?", सुळेंचा भातखळकरांवर पलटवार

खासदार सु्प्रिया सुळे यांनी किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट आयोजित कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमानंतर खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावळी त्यांनी पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शरद पवारांवर भाजप नेत्याने गंभीर आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलं.

'ईडीचे कागदपत्रे लीक होत आहेत का ? असे असेल तर देशासाठी ही फार गंभीर बाब आहे. त्यामुळे मी या संदर्भातील देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेऊन याबद्दल चर्चा करणार आहे. मला देशाची चिंता आहे'. जे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही कागदपत्रं आहेत का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर करण्यात आलेल्या आरोपांवर केला आहे.

Supriya sule
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, गुलाबराव पाटील चांगलं भाषण करायचे म्हणूनच...

दरम्यान, तृतीयपंथींच्या आरक्षणावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'सरपंचपासून ते लोकसभेपर्यंत तृतीयपंथी लोकांना आरक्षण मिळायलं हवं. आरक्षणाचा जागर सुरू व्हायला पाहिजे. सुरुवात झाली पाहिजे. सामाजिक परिवर्तन राज्यात होत आहे. बदलत्या जगात वावरण्यासाठी शिक्षण घ्यावं. देशात राष्ट्रवादी हा पहिला पक्ष आहे. ज्यांनी तृतीयपंथीसाठी सेल तयार केला आहे. इतर पक्षांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com