Baba Ramdev: रामदेव बाबांना काळं फसणार, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे आक्रमक; महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवणार

व्यासपीठावर उपस्थित अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती.
Baba Ramdev
Baba RamdevSaam TV

पुणे : बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही. रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार असा इशारा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे. (Baba Ramdev

महिलांनी काय घालायाच काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. बाबा रामदेव यांचं हे वादग्रस्त वक्तव्य अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्याचवेळी कानाखाली ओढली पाहिजे होती.  (Latest Marathi News)

Baba Ramdev
Baba Ramdev : "सलवार, साडी.. महिलांनी काही नाही घातलं तरी..." रामदेव बाबांची जीभ घसरली

महिलांनी साडी सलवार घालणे इथपर्यंत मान्य पण पुढचं विधान कितपत योग्य आहे, असा सवाल ठोंबरे यांनी उपस्थित केला.

रामदेव बाबांचं डोकं खाली आणि पाय वर करा म्हणजे त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार नाही.रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार, असा इशाराही त्यांनी दिला. गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी. भाजप निगडीत लोक वारंवार महिलांचा अपमान करतात याची आठवणही रुपाली ठोंबरे यांनी यावेळी करुन दिली.

Baba Ramdev
Amruta Fadnavis : मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम; अमृता फडणवीसांची काय म्हणाल्या?

नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव?

ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com