Sharad Pawar On Vedanta Foxconn: 'वेदांता' महाराष्ट्राबाहेर जायला नको होता; शरद पवार यावर पहिल्यांदाच बोलले

Sharad Pawar On Foxconn Vedanta Project: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच पण अगदी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar On Vedanta Foxconn
Sharad Pawar On Vedanta Foxconn saam tv

पुणे: 'वेदांता' प्रकल्प गुजरातला शिफ्ट करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच पण अगदी थेट प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होता, पण आता तो गेला. यावर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar On Vedanta Foxconn
Vedanta: 'गुवाहाटीतून सरकार आणलं, CM शिंदेंकडून 'वेदांता'च्या रुपात PM मोदींना रिटर्न गिफ्ट'

शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांना वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रकल्प गेला ना आता कशाला चर्चा करायची? हा प्रकल्प तळेगावला येणार होता, त्याची तयारी राज्य सरकारने केली होती. पण आता मला वाटत नाही की, प्रकल्प परत येईल. हा प्रकल्प जायला नको होता, पण गेला.

मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणत होते, याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. पण एकनाथ शिंदे त्या मंत्रिमंडळात मंत्री होते, आता तेच आरोप करत आहेत, आता हे ठीक नाही, आता चर्चा करण्यात अर्थ नाही असं शरद पवार म्हणाले. तसेच पीएम मोदींसोबत चर्चा झाली, पण त्यात काही होईल असं वाटत नाही. पालक जसे लहान मुलांची समजूत काढावी तसे समजूत काढण्यात येतेय, यावर चर्चा न केलेली बरी असा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, साधारणतः केंद्राची सत्ता हातात असेल तर गुजरातला गेले, त्यात तक्रार करण्यात अर्थ नाही. गुजरातवर लक्ष दिलं तर साहजिकच कुठल्याही माणसाला घरची ओढ असते असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. तळेगाव चाकण एमआयडीसी हे ऑटोमोबाईलच्या दृष्टिने महत्वाचे आहे असं पवार म्हणाले, त्याचप्रमाणे, मी स्वतः सरकारमध्ये असताना याचा विचार झाला. इकडे प्रकल्प झाला असता तर कंपनीला सोयीस्कर झाला असता. या देशात अत्यंत महत्वाचा प्रकल्प कोकणात करण्याचा ठरलं होतं पण परत तो चेन्नईला हलवला. हे प्रकल्प हलवणे पहिल्यादा घडलं नाही. यात आता काही होईल असं वाटत नाही. माझ्या दृष्टीने हा जायला नको होता आता चर्चा करायला नको असंही शरद पवार म्हणाले आहेत.

पुढे शरद पवार म्हणाले की, गुजरातच्या ढोलारा येथे प्रोजेक्ट जाणार आहे. तिथे यापूर्वी अनेक प्रोजेक्ट गेले, पण पाणी आणि इतर सुविधा नसल्यामुळे दुसरीकडे गेले यावर विचारा. इन्ड्रोन प्रकल्पाची खूप चर्चा झाली, हा प्रकल्प समुद्रात केला असं वाटतंय. क्रमांक एक हा महाराष्ट्र असायचा. महाराष्ट्राच कायम याला प्रोत्साहित करायचा. अधिकारी होते, त्यांचं एकच काम होतं. देशात इंडस्ट्री असेल तर हव्या त्या सोयी देणं आणि इथे या म्हणणं. आता ही यंत्रणा थंड झाली आहे. भरपूर जेवण झाल्यावरही ढेकर देतात तसं हा प्रकार झाला आहे. या यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे असंही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar On Vedanta Foxconn
Vedanta: 'गुवाहाटीतून सरकार आणलं, CM शिंदेंकडून 'वेदांता'च्या रुपात PM मोदींना रिटर्न गिफ्ट'

यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावरही निशाणा साधाला आहे. ते म्हणाले की, टीव्ही लावला की ही हवा हेच पाहायला मिळतं. एखादा दिवस ठिक आहे. राज्याच्या प्रमुखांनी राज्याचा विचार करायला हवा. आता हे पुरे आहे. वातावरण कसं सुधारेल याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. टीका करा पण रोज करु नका. आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे, त्याविषयी परत येण्याबाबत मला अपेक्षा नाही. मुख्यमंत्र्यांनी आता नवीन प्रकल्प येण्यासाठी प्रयत्न करायला हवा असं आवाहन यावेळी शरद पवारांनी केलं आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, मी मंत्रालयात असताना २ तास investor यायचे. तेवढ पोटेन्शियल होतं. तेवढा वेळ द्यावा लागायचा. मला कारभार काही दिसला नाही. गतिमान दिसतंय. एमआयडीसीमध्ये गुंडांचा त्रास, काही ठिकाणी हा प्रकार आहे. मी सुद्धा बैठक घेतली होती. त्यामुळे हे बदललं पाहिजे महाराष्ट्रात काही शब्द नव्याने प्रचलित झालेत. खोका हा शब्द मी आत्ता ऐकला. हे फक्त महाराष्ट्रात नाही. इतर ठिकाणी सुद्धा होतं असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com