Video: पुरंदरेंइतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही: शरद पवार

शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSaam Tv

पुणे - इतिहासाशी संबंध असलेल्या घटकांनी जे लिखाण केलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे आणि काही ठिकाणी धादांत असत्य आहे. पुरंदरेंइतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही, असं वत्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 'शिवचरित्र आणि विचारप्रवाह' या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केले.

पुरंदरेंइतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही. रामदासांचे योगदान काय? कोंडदेवांचे योगदान काय? जास्त खोलात मी जाऊ इच्छित नाही, असंही पवार म्हणाले. समितीने निष्कर्ष काढला दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींचा काडीमात्र संबंध नव्हता. मग पुरस्कार काढून टाकण्यात आला. अनेक गोष्टी अशा ज्या न पचणाऱ्या त्यामुळे मी खोलात जात नाही. सत्यावर आधारीत नव्या पिढीला प्रेरणा देणारा वास्तव इतिहास पाहीजे असंही पवार म्हणाले.

Sharad Pawar News
दगड डोक्यावर ठेवला काय आणि छातीवर ठेवला काय हा त्यांचा....; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंच्या झेड सुरक्षेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार म्हणाले, मला वस्तुस्थिती माहित नाही. पण शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती आहे की सुरक्षा पुरवणे याचा निर्णय घेणारे कॅबीनेट असत नाही. कॅबिनेटमध्ये याची चर्चा होत नाही. डीजी आयजी यांची समिती असते. त्यांच्याकडे याचा निर्णय होतो.

आज सकाळी वळसे पाटील यांना भेट झाल्यावर त्यांना विचारले त्यावेळी पाटील यांनी सांगितले, शिंदेंना झेड सिक्युरिटी होती आणि आहे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com