आजची मंत्रिमंडळ बैठक अखेरची? महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दिले संकेत

Political Crisis In Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे. ही बैठक अखेरची ठरू शकते, असे संकेत दिले जात आहेत.
आजची मंत्रिमंडळ बैठक अखेरची? महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दिले संकेत
Political Crisis in Maharashtra News, Latest Political NewsSaam Tv

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा प्रवास हा विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेले असतानाच, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे. ही बैठक अखेरची ठरू शकते, असे संकेत दिले जात आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत कळेल, मी राऊत यांचे ट्विट बघितले नाही, असे मुश्रीफ म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

संजय राऊत यांनी ट्विट केल्याबाबत विचारणा केली असता, हसन मुश्रीफ म्हणाले की, मला त्याबाबत काही माहीत नाही. मी त्यांचे ट्विट बघितले नाही. मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय ठरेल, असे मुश्रीफ म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनीच स्पष्ट संकेत दिले असल्याने ही मंत्रिमंडळ बैठक अखेरची ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Political Crisis in Maharashtra News)

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत ४० आमदार आहेत, असा दावा केला आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत खळबळ उडवून दिली होती. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष असून, जास्तीत जास्त सत्ता जाईल. ती परत येईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचे ट्विट केले. या ट्विटमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का? अशा शक्यतांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Political Crisis in Maharashtra News,   Latest Political News
Video : गुवाहाटीत प्रशासकीय हालचाली वाढल्या; बंडखोर आमदारांच्या महत्वाच्या कादगपत्रांवर सह्या

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, आज दुपारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतरच काही ठरू शकतं, असे संकेत महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यांनी दिले असतानाच, आता या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देऊ शकतात. ते राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर विरोधी गोटातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com