आमदार दिलीप मोहिते पुन्हा नाराज! कुणाला मतदान करणार याबाबत अद्यापही निर्णय नाही

NCP MLA Dilip Mohite Upset On MVA Government : अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटूनच आपण मतदानाबाबत ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
NCP MLA Dilip Mohite Upset On MVA Government, MLC Election 2022 News Updates, Vidhan Parishad Election 2022 News
NCP MLA Dilip Mohite Upset On MVA Government, MLC Election 2022 News Updates, Vidhan Parishad Election 2022 NewsSaam Tv

प्राची कुलकर्णी

मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. आजच्या या निवडणुकीसाठी (Elections 2022) सर्वच पक्षांकडून आपापल्या परीने विजयाची तयारी केली जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite Patil) नाराज असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council Elections) मतदान करण्याबाबत अद्यापही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटूनच आपण मतदानाबाबत ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Dilip Mohite Latest Marathi News)

हे देखील पाहा -

खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी ऐन मतदानाच्या दिवशी आपली नाराजी व्यक्त केली आहे. साम टिव्हीशी बातचीत करताना राष्ट्रवादीचे पुण्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली नाराजी जाहिर केली आहे. मोहिते म्हणाले की, मागच्या वेळेला नाराज होतो तेव्हा मी स्पष्ट सांगितलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. (Vidhan Parishad Election 2022 News)

पुढे ते म्हणाले की, मुंबईला गेल्यावर अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटून ठरवणार की, मतदान कुणाला करायचं. शरद पवार यांनी चर्चा केली, पण त्यानंतर काही झालं नाही. राज्यसभेनंतर चित्र पालटेल वाटलं पण काही झालं नाही असंही मोहिते पाटील म्हणाले आहेत. माझे प्रश्न हे एका दिवसांत सुटणारे आहेत, पण तरीही काम होत नाही. तसेच हे नेते फक्त सत्तेसाठी एकत्र बाकी आमचा सवतासुभा अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. तसेच याबाबत सत्तेच्या प्रमुखांनी विचार करावा आणि न्याय द्यावा अशी आशा त्यांनी मुख्यमंत्र्याकडून केली आहे.

NCP MLA Dilip Mohite Upset On MVA Government, MLC Election 2022 News Updates, Vidhan Parishad Election 2022 News
Maharashtra Vidhan Parishad Election 2022 : आमदार रवी राणांचा शाेध सुरु

राज्यसभेच्या निवडणुवेळीही होते नाराज

राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान १० जून २०२२ ला पार पडलं होतं. त्यावेळी आमच्याकडे दुर्लक्ष झालं अशी खदखद मोहितेंनी व्यक्त केली होती. तसेच आमच्या प्रकल्पांकडे, कामांकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला. दिलीप मोहिते यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. मोहिते पाटलांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केल्याने जयंत पाटील, प्रफुल पटेल, अजित पवार यांच्याकडून त्यांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र अद्यापही त्यांची नाराजी दूर झाली नसल्याचं त्यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com