
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. शिंदे हे भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची अशी शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , जयंत पाटील आदी. नेते उपस्थित होते. ( Maharashtra politics Latest Marathi News)
राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना, महाविकास आघाडीच्या नेत्यांची कॅबिनेट बैठक सुरू होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सुरुवातीला त्यांना केवळ 13 आमदारांचा पाठिंबा होता. मात्र आता सुंत्राकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येनं फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार भाजपाला पचनी पडलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी अनेकवेळा केला आहे. एकनाथ शिंदेंना फोडण्याचे षडयंत्र करतानाच त्याच दिवशी अनिल परब यांना नोटीस येते, या धावपळीत ते आमच्याबरोबर असून नयेत, हे षडयंत्र आहे. हे सर्व ठरवून केले जात असल्याचे ते म्हणाले होते. तर शिवसेनेचे जवळपास सहा खासदारही ईडीच्या रडारवर असून त्यांच्याकडूनही आता भाजपाबरोबर जाण्याची मागणी होत आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.