''राजकीय पोळ्या शेकण्यासाठी...' रोहित पवारांचा नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमध्ये एका युवकावर हल्ला झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
Nitesh Rane, Rohit Pawar
Nitesh Rane, Rohit PawarSaam Tv

मुंबई : नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमध्ये एका युवकावर हल्ला झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ( Rohit Pawar News )

राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होते. भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देत आहे. परंतु याबाबत आवाज उठवायला 'आमचं हिंदुत्व' कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'आमचा' तिसरा डोळा कधी उघडत नाही, अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

Nitesh Rane, Rohit Pawar
Nitesh Rane : '...तर आमचे हात कोणी बांधले नाहीत'; कर्जतमधील 'त्या' प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही टीका ट्विटरवरुन केली आहे. सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत. कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत. त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं. आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला 'आमचं हिंदुत्व' कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'आमचा' तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीयतर पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे, असं ट्विट आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले.

Nitesh Rane, Rohit Pawar
Sharad Pawar : पंजाब, हरियाणा, दक्षिणेत शेतकरी आत्महत्या होत नाहीत, मग आपल्याकडे का होतात ? शरद पवार म्हणाले...

कर्जतमधील 'त्या' प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमध्ये एका युवकावर हल्ला झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Nitesh rane News )

कर्जतमध्ये एका प्रतिक पवार नामक युवकाला बारा ते चौदा जणांकडून मारहाण झाली. प्रतिक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत सदर घटनेवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, 'प्रतिक पवार नावाचा एक युवक अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये जात असताना दहा ते पंधरा जणांनी थांवबलं. नुपूर शर्मा यांचा डिपी ठेवतो. हिंदू म्हणून आवाज करतो. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. सदर युवकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. त्याला ३५ टाके पडले असून युवक मृत्यूशी झुंज देत आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com