जखमी गोविंदा प्रथमेश सावंतची शिंदे सरकारकडून उपेक्षा; रोहित पवारांनी केली 'ही' मागणी

शिंदे सरकारने गोविंदा प्रथमेश सावंतला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
Rohit pawar
Rohit pawar saam tv

रश्मी पुराणिक

Rohit Pawar News : दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील गोविंदा प्रथमेश सावंत हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संघर्ष सुरूच आहे. प्रथमेश सावंतवर गेल्या महिन्याभरापासून केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळाचा गोविंदा प्रथमेश सावंत याची मुंबईत (Mumbai) केईएम रुग्णालयात जाऊन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भेट घेतली. शिंदे सरकारने गोविंदा प्रथमेश सावंतला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

Rohit pawar
बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका

दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील गोविंदा प्रथमेश सावंत याच्यावर गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू आहेत. याच प्रथमेशची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, 'प्रथमेश हा जखमी झाल्याने त्याच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहेच. त्याचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीतही आलं आहे. त्याची एक बहिण शिक्षण घेत आहे. आज प्रथमेश याच्या घरामध्ये कमावती व्यक्ती केवळ त्याचे काका हेच एकमेव अएसल्याने त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार पडत आहे'.

'प्रथमेश हा भविष्यात त्याच्या कुटुंबाचा आधार असून तो आज रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तो लवकर बरा व्हावा,अशी माझी सदिच्छा आहे. प्रथमेशच्या कुटुंबावर ताण असल्यामुळे जखमी गोविंदांना देण्यात येणारी सरकारने घोषित केलेली रक्कम प्रथमेशच्या कुटुंबाला लवकरात लवकर द्यावी', अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

'हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर त्याला संपूर्ण बरं होण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. तोपर्यंत त्याला खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. याचा सरकारने विचार करून त्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी. सरकारने प्रथमेश याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस नोकरी दिल्यास त्याच्या कुटुंबालाही सुरक्षा मिळेल', असेही ते म्हणाले.

Rohit pawar
बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा बदलली नाही; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

'प्रथमेशला भेटायला गेलो असताना एक प्रकर्षाने जाणवली आणि ती नमूद करायला पाहिजे. ती म्हणजे मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उत्तम सेवा दिली जाते. येथील डॉक्टर मंडळी, नर्स आणि इतर स्टाफ हे सर्वजण चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत', असेही रोहित पवार म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com