राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

अपघातामुळे वाहतूक विस्कळीत
MLA Sangram Jagtap
MLA Sangram Jagtap Saam Tv

पुणे: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची धडक झाली आहे. दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. दरम्यान, या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना मुंबईकडे नेण्यात आलं आहे.

हे देखील पाहा-

हा अपघात पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात (Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुणी देखील जखमी झाले नाही.

MLA Sangram Jagtap
काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे, दिल्ली आणि चेन्नईत छापे

आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बसबरोबर झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com