'सत्यमेव जयते, अखेर सत्याचा विजय झाला'; अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
supriya sule
supriya sule saam tv

Supriya Sule News : १०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलकीवर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यमेव जयते. शेवटी सत्याचा विजय झाला, अशा शब्दात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

supriya sule
Anil Deshmukh: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा; ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर

अनिल देशमुख हे जवळपास ११ महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यांनी वारंवार जामीन देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. अखेर त्यांचा जामीन अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'सत्यमेव जयते. शेवटी सत्याचा विजय झाला. मला मनापासून आनंद झाला आहे. अनिल देशमुख यांना जामीन झालाय. बाकीच्यांनाही लवकर जामीन होईल असं आम्हाला वाटतं'.

supriya sule
BJP News : गांधीजींना ब्रिटीशांकडून दरमहा १०० रुपये पेन्शन?; भाजप नेत्याचा जावईशोध!

संजय राऊत यांना ऑक्टोबर महिन्यात जामीन मांडला जाणार आहे. त्यावर बोलतना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्वांनाच लवकर जामीन होईल,त्यामध्ये नवाब मलिक असतील. एकनाथ खडसे यांचे जावई यांचे जावई यांनाही जामीन होईल त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत'.

दरम्यान, दसरा मेळाव्यावर होणाऱ्या कोट्यावधींच्या खर्चाबाबत सुप्रिया सुळे निर्णय नाराजी व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्, 'एवढी उधळपट्टी कशासाठी केली जाते हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. नोटाबंदीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी रक्कम आली कुठून हा प्रश्न आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com