Gujarat Election : राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, खासदार अमोल कोल्हेंना वगळलं

यंदा देखील गुजरातमध्ये (Gujarat) सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा देखील गुजरातमध्ये (Gujarat) सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील जोरदार तयारी सुरू केली असून निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Sanjay Raut : संजय राऊत यांना पुन्हा ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यादीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, सोनिया दुहान यांच्यासह ३१ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, या यादीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचं नाव नसल्याने आता चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून ओळख आहे. मात्र गुजरात निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आलं आहे.

Sharad Pawar
Nawab Malik : नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळख असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे कोल्हे यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसमधील नाराजी नाट्याचा परिणाम झाल्याची देखील चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिराला कोल्हे गैरहजर होते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान, स्टार प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे यांचं नाव वगळ्याने चर्चांना उधान आलं आहे.

काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

गुजरात विधानसभा काबीज करण्यासाठी काँग्रेसने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियकां गांधी, द्विगविजय सिंग, मलिक्कार्जून खर्गे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा, या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com