Pune : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांना घाबरतात? पवारांचा खोचक सवाल

राज्यपालांची वैचारिक पातळी कमी झाली आहे; पवारांची टीका
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv

पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले. याने महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यात एकीकडे सावरकर वाद सुरू असतानाच आता भाजपकडूनही शिवरायांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सर्व स्थरातून टीका होत आहे. त्यातच आता कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यपालांना घाबरत आहेत का? असा सवालच रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

Eknath Shinde
Pune News : राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक; कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्याला १ लाखांची रोख

रोहित पवार म्हणाले की, राज्यपालांची वैचारिक पातळी कमी झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे.

राज्यपालांना हटवा ही आमची मागणी केंद्राने मागेच एकली असती तरी आज एवढ गोंधळ झाला नास्ता अस देखील रोहीत म्हणाले आहेत. राज्यात आणि देशात बेरोजगारीचे प्रश्न आहेत, पण आता डोक्यावरून पाणी गेलं आहे. सत्ताधाऱ्यांनी सावरकरांच्या बाबतीत आंदोलन केले पण राज्यपालांच्या वक्तव्यावर सत्ताधारी बोलले नाहीत. त्यांचे हे प्रेम सेलेक्टिव्ह आहे. अस देखील रोहीत पवार म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हटवा. ही व्यक्ती महाराष्ट्राला न शोभणारी आहे. एवढे दिवस ही व्यक्ती महाराष्ट्रात कशी काय राज्यपाल म्हणून राहते? त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर काही बोलत नाही. ते राज्यपालांना घाबरतात का? त्याबद्दल माहीत नाही, असं रोहित पवार म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com