एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचं ठाऊक नव्हतं: शरद पवार

एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचं ठाऊक नव्हतं: शरद पवार
Eknath Shinde/ Sharad PawarSaam Tv

मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे (Shivsena) खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सेनेच्या सुमारे 17 आमदारांसह सूरतला गेल्याचे समजते. दरम्यान शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या संपूर्ण घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय अशी मागणी असल्याचं सांगत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणेल की, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असल्याचं मला ठाऊक नव्हतं. हे मला तुमच्याकडूनच समजतं आहे.

पण जर कोण असं बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा, तर शिवसेनेकडेच मुंख्यमत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व बदलण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

हे देखील पाहा -

तसंच उद्धव ठाकरेंशी माझं बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा कारण आहेत आणि या बैठकीनंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहे. असे देखील पवार यावेळी म्हणाले आहे.

Eknath Shinde/ Sharad Pawar
एकनाथ शिंदे आणि 'ऑपरेशन लोटस'मागे भाजपच्या महाराष्ट्राच्या या नेत्याचा हात?

पुढे शरद पवार म्हणाले की, मविआ सरकार बनण्यापूर्वीही अशी बंडाळी झाली होती. हे तिसऱ्यांदा घडलं आहे. याआधी देखील दोनदा असे प्रयत्न झाले होते मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्या वेळी भाजपने आमदारांना हरयाणाला नेलं होतं. मात्र राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून सरकार निट चाललं असल्याचं स्पष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी दिलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com