
Sharad Pawar On Patrachal Scam Case : 'पत्राचाळ प्रकरणातील चौकशीला आमची विरोध करण्याची भूमिका नाही. जेवढ्या लवकर चौकशी करता येईल ती करा. चौकशी झाल्यानंतर जर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यासंबंधी काय भूमिका घेणार हेही राज्य सरकारने सांगावं', असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्य सरकारला केला आहे. (Sharad Pawar News Today)
मुंबईतील पत्राचाळ प्रकल्पातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव घेतलं आहे. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. या आरोपानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. आम्ही चौकशीला जाण्यासाठी तयार आहोत. पण, चौकशीनंतर आरोप सत्याला धरून नसेल, तर आरोप करणाऱ्यांवर सरकार काय करणार ?, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांवरील आरोप काय ?
शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भातखळकरांनी ही मागणी केली.
पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकर यांनी म्हटलं होतं.भातखळकरांच्या या मागणीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.