राष्ट्रवादीचं ठरलं! आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांचा 'मास्टर प्लॅन'

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या सर्व खासदार, मंत्री, राज्यमंत्री यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रवादीचं ठरलं! आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांचा 'मास्टर प्लॅन'
राष्ट्रवादीचं ठरलं! आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांचा 'मास्टर प्लॅन'Saam Tv

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या सर्व खासदार, मंत्री, राज्यमंत्री यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीने राज्यात बंद पुकारला होता. त्यात बरोबर त्यात सहभाग नोंदवलेल्या सर्वांचे आभार मानल्याचे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. राज्यातील दुकाने, व्यापारी यांच्यावरील कोरोना निर्बंध दूर कराण्यासाठी चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत विनंती करण्यात येईल अशी माहिती मलिकांनी दिली.

राष्ट्रवादीचं ठरलं! आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांचा 'मास्टर प्लॅन'
खूशखबर! आता LPG सिलेंडर मिळणार 634 रुपयांना; कसा ते जाणून घ्या

आगामी निवडणूकांबाबत काय म्हणाले?

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या असल्याचे मत मलिकांनी व्यक्त केले आहे. आणि आगामी काळात जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका निवडणुका होणार आहेत, यासाठी ३६ जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यावर सोपवण्यात आली असल्याचही ते म्हणाले. पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवणार आणि आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणितं बघून निर्णय घेतले जातील असे नवाब मलिक म्हणाले.

'केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर'

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना, त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास दिला जातोय, त्यामुळे आम्ही खंबीरपणे याला सामोरं जाऊ असा पक्षाने निर्णय घेतला आहे. आमचे नेते कार्यकर्ते डगमगणार नाही, त्याचबरोबर भाजपचा पूर्ण ताकदीने मुकाबला केला जाईल असे नवाब मलिक म्हणाले. फडणवीसांनी विरोधी पक्ष नेता असल्याचे मान्य करावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.