इंधन दरवाढ-महागाई विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन

NCP Woman Workers Protests Against Central Govt in Thane: राष्ट्रवादीच्या ठाणे आणि पालघर विभागीय महिला अध्यक्षा तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
इंधन दरवाढ-महागाई विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन
NCP Woman Workers Protests Against Central Govt in Thane: विकास काटे

मुंबई: राज्यासह देशात दिवसेदिवस इंधन दरवाढीसह (Fuel Price Hike) सिलेंडरचे भावही वाढले आहेत. केंद्र सरकारने याकडे लक्ष द्यावे यासाठी आज ठाण्यात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या वतीने निदर्शन (Protest) करण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या निदर्शनाचे नेतृत्व ठाणे आणि पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. (NCP Woman Workers Peaceful Protests Against Central Govt increased Petrol,Gas,Taxes.etc at Thane. On the presence of NCP Thane Women President Ruta Awhad.)

हे देखील पाहा -

ऋता सामंत-आव्हाड (Ruta Samant - Awhad) यांनी केला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या त्या पत्नी आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्या ठाणे आणि पालघर विभागीय महिला अध्यक्षा आहेत. याआधीही त्या अनेकदा आंदोलनात दिसल्या असून पक्षाच्या कार्यात त्या नेहमी सक्रिय असतात. यावेळी त्याच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकारी आणि शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गॅस दरढीचा जाहिर निषेध, केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, गॅस झाला हजारी पार जागे व्हा मोदी सरकार अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

NCP Woman Workers Protests Against Central Govt in Thane:
''केतकी तर चार आण्याची...'' राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका

केतकी चितळेवर टीका

यावेळी त्यांनी अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणाबाबत भाष्य केलं. अभिनेत्री केतकीवर टीका करत त्या म्हणाल्या की, मला नाही वाटत हे खरं प्रोफाईल असेल. कारण स्तुती करताना माणून स्वतःचं नाव वापरतो. पण असं भ्याड काही बोलताना खोटी ओळख दाखवतो. जर गृहखात्याने यावर काही केलं नाही तर आम्हालाच काहीतरी करावं लागेल असंही त्या म्हणाल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.