Politics : आम्हाला हेच मुख्यमंत्री हवेत! राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण उद्धव ठाकरेंच्या भेटीला

NCP Leader Vidya Chavan Supports to CM Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या आहेत.
Politics : आम्हाला हेच मुख्यमंत्री हवेत! राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण उद्धव ठाकरेंच्या भेटीला
NCP Leader Vidya Chavan Meets to CM Uddhav ThackeraySaam Tv

सचिन जाधव

मुंबई: शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या समवेत 80 टक्के पेक्षा जास्त शिवसेनेच्या (shivsena) आमदारांनी बंडखाेरी केल्याने राज्यात कार्यरत असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार (mva) काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंना त्यांच्यात आमदारांनी दगा दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांनी आणि दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्य समर्थानात पुढे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या आहेत. (CM Uddhav Thackeray Latest News)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण या उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, शिवसेना एकटी नाही काँग्रेस राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे असं म्हणत त्यांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे हेच आम्हाला मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत असंही विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपलाही धारेवर धरलं आहे. हे सगळं भाजप करतंयं असा आरोप करत आम्ही भेटून उद्धव ठाकरे यांना सांगणार आहोत असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच भाजप नेत्यांचं यापुढे काहीही चालणार नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.

NCP Leader Vidya Chavan Meets to CM Uddhav Thackeray
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुंबईकडे? गुवाहाटीतून विमानतळाच्या दिशेने रवाना

दरम्यान शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलेल्या १२ आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या १२ समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या (Shivsena) वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. अशातच शिंदे गटाकडे आकडा फक्त कागदावरती आहे. ते सरकार बनवू शकत नाही, शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल. असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलतांना म्हटलं आहे.

Edited By Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com