
ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही
पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील विश्रामबाग पोलीस (Pune Police) ठाण्यात तक्रार ही तक्रार दाखल करण्यात आली. पुण्यात उदय सामंत यांच्यावर जो हल्ला करण्यात आला होता, तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी केला होता. याचाच निषेध आणि तक्रार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. (Gopichand padalkar Latest News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांच्या कारवर पुण्यात अज्ञात टोळक्याने हल्ला केला. सामंतांच्या कारची काच फोडल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला असल्याच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केला होता.
गळ्यात भगवे मफलर घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत घोषणाबाजी करत होते. याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. (NCP Pune Todays News)
म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशी बोचरी टीका पडळकरांनी विरोधी पक्षांवर केली होती. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पुण्यात मोठ्या प्रमाणे शिवसैनिक नाहीत ते राष्ट्रवादीचे लोक आहेत, असं पडळकर काल म्हणाले होते
दरम्यान, याचाच निषेध आणि तक्रार म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांची भेट घेऊन त्यांना तक्रार सुपूर्द केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप नेत्या रूपाली ठोंबरे आदी उपस्थित होते.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.