ड्रेनेजचे काम ४ वर्षांपासून रखडल्याने बारामती नगरपालिकेसमोर राष्ट्रवादीचे आमरण उपोषण

ड्रेनेजचे काम ४ वर्षांपासून रखडल्याने बारामती नगरपालिकेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
ड्रेनेजचे काम ४ वर्षांपासून रखडल्याने बारामती नगरपालिकेसमोर राष्ट्रवादीचे आमरण उपोषण
ड्रेनेजचे काम ४ वर्षांपासून रखडल्याने बारामती नगरपालिकेसमोर राष्ट्रवादीचे आमरण उपोषणमंगेश कचरे

बारामती : बारामती नगरपालिकेसमोर आज पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि एक पुरुष उपोषणाला बसले आहेत, विशेष म्हणजे हे सर्व राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. (NCP workers have started a hunger strike in front of Baramati Municipality as the drainage work has been stalled for 4 years)

हे देखील पहा -

बारामती नगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक ४ मध्ये गेली चार वर्षांपासून ड्रेनेजचे काम रखडले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला बसलेले गेल्या चार वर्षांपासून बारामती नगरपालिका व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. तरी देखील ड्रेनेज लाईन ही मेन लाईनला जोडली जात नाही त्यामुळे खराब पाणी परिसरामध्ये साचत आहे. या खराब पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच डासांचा उपद्रव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे डेंग्यू आणि चिकणगुण्या रोगाची लागण अनेक जणांना झाली आहे.

ड्रेनेजचे काम ४ वर्षांपासून रखडल्याने बारामती नगरपालिकेसमोर राष्ट्रवादीचे आमरण उपोषण
मराठमोळ्या रूपातील वस्त्र परिधान केलेल्या गणेश मूर्ती सांगली-मिरजेत दाखल... 

खराब पाणी परिसरामध्ये साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, मात्र नगरपालिका आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी येथील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून आजपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com