
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यावरून चांगलीच हमरी-तुमरी होत आहे. त्यातच मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता गुद्द्यावर येऊन ठेपला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकत्यांनी भाजपच्या एका प्रवक्त्याच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांबाबत पोस्ट टाकून टीका केली होती. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट कार्यालयात जाऊन आंबेडकर यांच्या कानशिलात लगावली. (Pune Latest Marathi News)
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी थेट विनायक आंबेडकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला. दरम्यान, जाब विचारत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विनायक आंबेडकर यांच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.
दरम्यान, पवार यांच्यावरील पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. दुसरीकडे पोस्टवरून वाद झाल्यानंतर विनायक आंबेडकर यांनी माफीही मागितली होती. "माझ्या कवितेतील शेवटच्या दोन ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या त्या मागे कोणताही वाईट हेतू नव्हता तरीही त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे मी ही पोस्ट मागे घेत आहे". अशा शब्दात भाजप प्रवक्ते विनायक आंबेडकर यांनी माफी मागितली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.