'रातकिड्याला वाटते सकाळ होत नाही पण...'; जेपी नड्डांच्या वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंचं प्रत्युत्तर

संजय राऊत हे चांगली आपली भूमिका मांडू शकतील. अनेकजण यावर बोलत आहेत. मात्र, त्यांना बोलायच नैतिक अधिकार नाही.
Neelam Gorhe On JP Nadda
Neelam Gorhe On JP NaddaSaam TV

सचिन जाधव -

पुणे : 'फक्त भाजप पक्ष राहणार असं म्हणणाऱ्यांना सांगवं अस वाटतं की, जेव्हा सायंकाळ होते तेव्हा रातकिड्याला वाटते सकाळ होत नाही पण, असं होत नाही.' असं म्हणत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

त्या आज सारसबाग कॉर्नर, स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी आल्या असता माध्यामांशी बोलत होत्या.

भाजपशी (BJP) मुकाबला करण्याची क्षमता कोणत्याही राष्ट्रीय पक्षात नाही. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shivsena) अंत होत असून, देशात फक्त भाजपच राहील, बाकी सर्व राजकीय पक्ष नष्ट होतील, असा दावा जे.पी नड्डा यांनी केला आहे. शिवाय कोणताही राष्ट्रीय पक्ष या स्थितीत नाही जो भाजपला पराभूत करू शकेल असंही नड्डा यांनी बिहार मध्ये केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

पाहा व्हिडीओ -

त्या म्हणाल्या, 'फक्त भाजप पक्ष राहणार असे म्हणऱ्यांना सांगव अस वाटतं की, मला असं वाटतं 'जेव्हा सायंकाळ होते तेव्हा रातकिड्याला वाटतेय सकाळ होत नाही पण अस होत नाही असा टोला त्यांनी नड्डा यांना लगावला.

यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, 'संजय राऊत यांना मुदत मागितली ती दिली नाही, ही सगळ न्यायालयाने प्रक्रिया सुरू असताना बोलणं योग्य नाही. संजय राऊत हे चांगली आपली भूमिका मांडू शकतील. अनेकजण यावर बोलत आहेत. मात्र, त्यांना बोलायच नैतिक अधिकार नाही.

Neelam Gorhe On JP Nadda
Raj Thackeray : राऊतांविषयी केलेलं राज ठाकरेंचं ते भाकीत खरं ठरणार? चर्चांना उधाण

संजय राऊत यांनी खूप उत्तुंग काम केलेलं आहे. ते त्यांची बाजू नीट मांडतील, काही लोक ज्यांनी साहित्यिकांची मुंडकी कापली ते बोलत आहेत,मीडिया ट्रायल करत आहेत ,अशी काही बांडगुळे आहेत ते टीका करताहेत,न्यायालयीन प्रक्रियेत बांडगुळ प्रवृत्तीचा उच्छाद होऊ नये असं परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शिवाय राऊत यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका कालच मांडली असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com