अरबी समुद्रात नवे संकट; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यास इशारा

दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात नवे संकट; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यास इशारा
अरबी समुद्रात नवे संकट; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यास इशाराचेतन इंगळे

पुणे: दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे नवं संकट पुढील चोवीस तासात सक्रिय होणार आहे अशी माहिती आहे. परिणामी पुढचे पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने IMD विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

आज हवामान विभागाने पुणेसहित रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि नांदेड या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट Yellow Alert जारी केला आहे. संबंधित तेरा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांमध्ये विजांच्या कडकडाट आणि जोरदार पाऊस कोसळण्याची धडकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याठिकाणी वेगवान वारे वाहणार असून ३० ते ४० किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार आहे. यासोबतच आज परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

अरबी समुद्रात नवे संकट; पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यास इशारा
बीड: 'त्या' बालविवाहितेवर बलात्कार प्रकरणी आणखी चौघे अटकेत

उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तर पुढील चार दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच आजपासून पुढील पाचही दिवस पुणे जिल्ह्यात मेघगर्जना होऊन जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com