
मुंबई : सरकार वाचविण्यासाठी निवडणुका होणार अशा आमदारांना धमक्या काय देताय, चिंता नको. महाराष्ट्रात नवे सरकार येणार. विकासपर्व पुन्हा नव्याने सुरू होणार असं सूचक ट्विट भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे. एकीकडे राज्यातील राजकारणात अस्थिरता निर्माण झाली असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावला आहे. जवळपास ४० आमदारांता आपणाला पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर आणि एकनाथ शिंदे यांचा गट, पक्षातील वजन पाहता हे सरकार अल्पमतात येऊ शकतं याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचं म्हटलं आहे.
त्यामुळे आता हे सरकार पडणार का ? आणि मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असा चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय सरकार बरखास्त झाल्यास मध्यावर्ती निवडणुका देखील लागू शकतात असा देखील त्यांच्या ट्विटचा अर्थ होतो. त्यामुळे राऊत यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणुकीची धमकी दिली की काय? अशी चर्चा सुरु होती आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्टिट करत राज्यात नवं सरकार येणार असं म्हटलं आहे.
राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असं घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,
विकासपर्व पुन्हा नव्याने सुरू होणार असं त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे मिळून सत्तास्थापन करणार की काय अशा चर्चा सुरु आहेत. कारण मध्यावर्ती निवडणुका लावायच्या नसतील तर कोणाला तरी सत्तास्थापन करावी लागणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.