Mumbai Crime: दबक्या पावलांनी आला अन् डल्ला मारुन पसार झाला; लग्न समारंभात घुसून लाखोंचा ऐवज लंपास

Theft In wedding: चोरट्याने चोरुन नेलेल्या या पाकीटामध्ये एकूण लाखभर रुपयांची रक्कम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Theft In Wedding
Theft In Wedding saam tv

सिद्धेश म्हात्रे, प्रतिनिधी...

New Mumbai Crime: सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधुम सुरू आहे. लग्न म्हणजे धावपळ, गडबड आणि गोंधळ आलाच. अशा गोंधळात अनेकदा चोर कधी हात साफ करुन जातात, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. नवी मुंबईमध्ये एक अशीच घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका चोरट्याने लग्न समारंभात घुसून वधू वराच्या पाकीटांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.

Theft In Wedding
New Parliament Building: नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात! राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हावं... जनहित याचिका दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील (Mumbai) उलवेमध्ये एका लग्न समारंभात चोरट्याने वधु वराच्या पाकीटावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या हॉलमध्ये सर्वजण फोटो काढण्यात व्यक्त असताना चोराने ही हात सफाई केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, उलवे येथील रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या एका लग्न समारंभात (Wedding) हा प्रकार घडला आहे. मात्र चोरट्याची ही संपूर्ण हात चलाखी एका कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळेच त्याचे बिंग फुटले आहे. (Latest Marathi News)

Theft In Wedding
Swabhimani लढविणार लाेकसभेच्या सहा जागा; 'या' मतदारसंघातून Raju Shetti लढणार

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त असताना चोराने खुर्चीवर ठेवलेली मोठी बॅग लंपास केल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्याने चोरुन नेलेल्या या पाकीटामध्ये एकूण लाखभर रुपयांची रक्कम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आळा असून पोलीस (Police) चोरट्याचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com