Omicron : मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!

राज्यामध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले
Omicron : मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!
Omicron : मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!Saam Tv

मुंबई : राज्यामध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्य सरकारने (State Government) व्यक्त केली आहे. यातच काही दिवसांवर नाताळ (Christmas) येऊन ठेपला असून नव्या वर्षाच्या स्वागताची देखील तयारी सुरू आहे. हे लक्षात घेत नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) पोलिसांनी (police) मुंबईमध्ये नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध उद्यापासून म्हणजेच १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अशा १६ दिवसांच्या कालावधीकरिता लागू असणार आहेत.

हे देखील पहा-

काय आहेत नवे निर्बंध?

- निर्बंधांच्या या १६ दिवसांच्या कालावधीमध्ये कार्यक्रमांचे आयोजक, सहभागी होणारे लोक, पाहुणे, ग्राहक या सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झाले असणे बंधनकारक आहे.

- या दरम्यानच्या काळात दुकाने, मॉल, आस्थापना, कार्यक्रमांची ठिकाणे, मेळाव्यांच्या ठिकाणी आलेल्या व्यक्तींनी लसींचे २ डोस घेतले असले पाहिजेत. अभ्यागत आणि ग्राहकाचे देखील पूर्ण लसीकरण झाले असले पाहिजे.

- मुंबईमधील सर्व सार्वजनिक वाहतूकसेवेद्वारे जे लोक प्रवास करत आहेत, अशा सर्वांचे लसीकरण झाले असले पाहिजे. लशीचे २ डोस न घेतलेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

-परराज्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण (Vaccination) झाले असावे. किंवा त्यांनी ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणी केली असली पाहिजे.

Omicron : मुंबईत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!
Nagpur School : नागपूरमधील शाळा आजपासून गजबजणार

-कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी, स्पर्धा, मेळावे किंवा समारंभांच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची अनुमती असणार आहे. जर अशा कार्यक्रमांमध्ये एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारांपेक्षा जास्त असेल, तर स्थानिक प्राधिकरणाला याविषयी माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

- बंदीस्त सभागृहांमध्ये, बंदिस्त रेस्टॉरंट्समध्ये तसेच हॉलमध्ये ५० टक्के इतक्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही.

- मोकळ्या जागी २५ टक्क्यांहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

- ३१ डिसेंबर आणि नाताळानिमित्त आयोजित कार्यक्रम, पार्ट्यांवर प्रत्येक वॉर्डामध्ये महापालिकेची ४ पथके टेहळणी करण्याकरिता तैनात ठेवण्यात येणार आहेत.

-नियम मोडणाऱ्या कार्यक्रमांचे आणि पार्ट्यांच्या आयोजकांवर, तसेच रेस्टॉरंट्सचे मालक, हॉटेलचे मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com