कस्टम विभागाची मोठी कारवाई; जेएनपीटी बंदरात लाखो टन घातक कचऱ्याचे कंटेनर्स जप्त

hazardous Aluminium Dross in JNPT Customs News : जेएनपीटीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या कंटेनर्सची संख्या किमान ४८६ इतकी आहे.
Nhava Sheva Customs officials seize 18 containers having hazardous Aluminium Dross
Nhava Sheva Customs officials seize 18 containers having hazardous Aluminium DrossTwittter / @jnchcustoms

मुंबई: बहरीनमधून (Bahrain) आलेल्या लाखो टन घातक कचऱ्याचे कंटेनर्स उरणच्या जेएनपीटी बंदरात कस्टम (JNPT Customs) विभागाने जप्त केले आहेत. या कंटेनर्समध्ये 'ॲल्युमिनियम ड्रॉस' (Aluminium Oxide Industrial Grade) हा आरोग्यासाठी घातक असलेला कचरा आहे. गेल्या दहा दिवसांत कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल १८ कंटेनर्स जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय कस्टम विभागाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून देण्यात आली आहे. पण जेएनपीटीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या कंटेनर्सची संख्या किमान ४८६ इतकी आहे. (Nhava Sheva Customs officials seize 18 containers having hazardous Aluminium Dross)

गंभीर बाब म्हणजे परवान्यानुसार कलकत्ता आणि विशाखापट्टणम या बंदरांमध्ये हे कंटेनर्स उतरवण्याची परवानगी असताना जेएनपीटी बंदरावर हे कंटेनर्स उतरवल्याने या व्यवहारावर जेएनपीटी प्रशासनाचं नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच केंद्राच्या DGFT पॉलिसीनुसार ॲल्युमिनियम ड्रॉसच्या आयातीवर बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घातक कचऱ्याच्या (toxic industrial waste) आयातीला परवानगी मिळालीच कशी असा सवाल पर्यावरणवादी उपस्थित करतायत. शिवाय आता कस्टमच्या कारवाईमुळे ही बाब समोर आलीय, मात्र यापुर्वीही बंदी असलेला घातक कचरा अशा पद्धतीने खुलेआम आयात केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याबाबत साम टीव्हीने कस्टम अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे (Maharashtra Pollution Control Board) सचिव नंदकुमार गुरव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com