NIA ची मुंबईत पुन्हा मोठी कारवाई; डी गँगशी संबंधित दोघांना अटक

आज या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
NIA ची मुंबईत पुन्हा मोठी कारवाई; डी गँगशी संबंधित दोघांना अटक
Dawood IbrahimSaam Tv

मुंबई - एनआयएच्या (NIA) टीमने गुरुवारी चार दिवसांच्या चौकशीनंतर छोटा शकील याच्या सोबत मनी ट्रेलचा व्यवहार आढळून आल्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. आरिफ शेख आणि शब्बीर शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी मुंबई (Mumbai) येथील ओशिवरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. आज या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हे देखील पाहा -

डी कंपनीच्या 29 ठिकाणांवर छापे

दरम्यान, मोठी कारवाई करत NIA ने सोमवारी गुंड छोटा शकील आणि त्याचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूट आणि मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याचा ट्रस्टी याला ताब्यात घेतले. यादरम्यान एनआयएने डी कंपनीच्या 29 ठिकाणांवर छापे टाकले आहेत.त्यात छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांचा समावेश होता. हे 93 बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निर्दोष सुटले होते.

Dawood Ibrahim
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास

एनआयएचे पथक गेल्या 4 दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे 18 जणांची चौकशी करत होते. दरम्यान, माहीम दर्गा ट्रस्टी सुहेल खांडवानी, सलीम फ्रूट, गुड्डी पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, अजय गोसालिया, कय्युम शेख, समीर हिंगोरे यांना चौकशीनंतर सोडण्यात आले. याप्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.