Umesh Kolhe Case: उमेश कोल्हे प्रकरणात मोठी अपडेट; NIAकडून आणखी २ संशयितांना घेतले ताब्यात

Umesh Kolhe Latest News: एनआयएकडून उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आज, बुधवारी संशयित दोन आरोपींना ताब्यात घेतले.
Umesh Kolhe Case
Umesh Kolhe CaseSaam TV

अमर घटारे

अमरावती/ मुंबई: महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आणखी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुर्शिद अहमद रशीद (वय ४१), अब्दुल अरबाज सलीम (वय २३) अशी दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. (Umesh Kolhe Case Updates)

हे देखील पाहा -

एनआयएकडून या दोघांना अटक करून मुंबईत आणण्यात येणार आहे. अमरावतीतील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरणात आरोपींनी त्यांच्यातील एका आरोपीवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला केल्यानंतर मागील बुधवारी येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना अन्य तुरुंगात नेण्यात यावे, असे सांगितले होते.

एनआयएकडून उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आज, बुधवारी संशयित दोन आरोपींना ताब्यात घेतले. मुर्शिद अहमद रशीद आणि अब्दुल सलीम अशी या दोघांची नावे असून, मुर्शिदवर हत्या करण्यासाठी पैसे जमा केल्याचा आरोप आहे. तर फरार आरोपींना लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप अब्दुलवर आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Umesh Kolhe Case
Shivsena: बंडाला थंड करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे; जे. पी. नड्डांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्युत्तर

आरोपीवर तुरुंगात हल्ला, अहवाल विशेष कोर्टात

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर तुरुंगात पाच कैद्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. तुरुंग अधिकाऱ्यांनी या घटनेचा अहवाल एनआयएच्या विशेष कोर्टात सादर केला होता. आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com