मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या व्यक्तींवर सर्च ऑपरेशन सुरू; 20 ठिकाणी छापे

नागपाडा, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भिवंडीबाजार येथेही कारवाई सुरू आहे
मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या व्यक्तींवर सर्च ऑपरेशन सुरू; 20 ठिकाणी छापे
NIASaam Tv

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील (Mumbai) 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. ही 20 ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबंधीत आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यावर ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे.

NIA
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

डी कंपनी ही संयुक्त राष्ट्रांनी (UN) प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे. त्याच वेळी, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला 2003 मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याच्यावर 25 दशलक्ष बक्षीसही ठेवण्यात आले होते. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. यापूर्वी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती.

NIA केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नाही तर अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसिना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.