The strategy of Ashish Shelar and Nilesh Rane In Maharashtra Rajya Sabha Election 2022
The strategy of Ashish Shelar and Nilesh Rane In Maharashtra Rajya Sabha Election 2022Saam Tv

Rajya Sabha Election : आशिष शेलार-नितेश राणेंच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

Strategy of Ashish Shelar and Nilesh Rane In Maharashtra Rajya Sabha Election 2022 : काल (शुक्रवारी) राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते.

सुशांत सावंत

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगलीय ती शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या बाद झालेल्या एका मताची. सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत नेमकं बाद तरी कसे झाले असा प्रश्न सर्वाना पडला असेल. मात्र शिवसेनेचे हे एकमेव मत बाद होण्यामागे महत्वाची भूमिका बजावली ती भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी. (Due to the strategy of Ashish Shelar and Nilesh Rane, Shivsena lost one vote of Suhas kande in maharashtra rajya sabha election 2022)

हे देखील पाहा -

राणे कुटूंब आणि शिवसेना हा वाद तसा महाराष्ट्राला नवा नाही. अनेकदा शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीवेळी नितेश राणेंमुळे शिवसेनेचे एक मत बाद झालेय आणि शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. काल (शुक्रवारी) राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे पोलिंग एजंटची भूमिका बजावत होते. याच दरम्यान नितेश राणे यांना सुहास कांदे यांनी मतदान करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे जाणवले. हीच बाब नितेश राणे यांनी आशिष शेलार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेत हे मत बाद करण्याची मागणी केली.

The strategy of Ashish Shelar and Nilesh Rane In Maharashtra Rajya Sabha Election 2022
"ते घोडे आहेत, हरभरे टाकू तिकडे जातात"; पराभवानंतर संजय राऊत अपक्ष आमदारांवर भडकले

अन केंद्रीय निवडणूक आयोगाने मत ठरवले बाद

दरम्यान भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महिला आणि बाल कल्याण मंत्री यशमोती ठाकुर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात यावे अशी मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात ठरवले. सुहास कांदे यांचे मत हे संजय राऊत यांच्या कोट्यातील होते. त्यामुळे राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का दिला असेच म्हणावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com