अशा लोकांना फटके मिळाल्याशिवाय कळणार नाही; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

संजय पांडे यांच्यासारखे आयुक्त आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे अधिकारी जोपर्यंत आहेत, तो पर्यंत असेच हल्ले होत राहणार, असा आरोपही त्यांनी केला.
Nilesh Rane
Nilesh RaneSaam Tv

मुंबई: भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर काल मुंबईत हल्ला झाला. या हल्ल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांनीही निषेध व्यक्त करत, आपला शत्रू नीच असल्याची टीका राणे यांनी शिवसेनेवर केली. आपल्या विरोधकांसोबत बोलण्याची भाषा वेगळी असल्याचे निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले. (Nilesh Rane On Shivsena)

निलेश राणे म्हणाले, सोमय्या साहेबांना सांगण्यासाठी आलो आहे की, आपला शत्रू नीच आहे. अशा लोकांसोबत कसे वागायचे असते यांच्याशी बोलण्याची भाषा वेगळी असते. जे काही चाललं आहे ते महाराष्ट्र बघतोय अस या आधी कधीच झालं नव्हतं कोणाच्याही घरी जा दगडं मारा हे असं कधीच घडल नव्हते. आज परिस्थिती बिकट झाली आहे. जीवाला धोका जरी असला तरी देखील इथे केसेस होत नाहीत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला.

Nilesh Rane
नवनीत राणा, रवी राणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

'मी बाकीच्या नेत्यांनाही सांगणार आहे, ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर द्यावे लागणार आहे. संजय पांडे यांच्यासारखे आयुक्त आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखे अधिकारी जोपर्यंत आहेत, तो पर्यंत असेच हल्ले होत राहणार. असंही निलेश राणे म्हणाले. म्हणून आता दया नाही. सगळ्या नेत्यांना सांगणार लढाई त्यांनी रस्त्यावर आणली ती लढाई रस्त्यावर आपण संपवायची, असा इशाराही राणे (Nilesh Rane) यांनी दिला.

खासदार नवनीत राणा यांच्यावर बोलताना राणे म्हणाले, जे न्यायालयाने सांगितले आहे आणि जो निकाल दिला आहे, त्यावर मी बोलणे उचित ठरणार नाही, पण महाराष्ट्रात खोट्या केसेस कसे बनवल्या जातात हे दिसून येत आहे. वरून सरदेसाई घरावर जातात, घोषणा देतात, पोलीस बॅरिगेटिंग तोडतात त्यांच्यावर केसेस नाही, असा आरोपही त्यांनी केली.

हे देखील पाहा

खार पोलीस स्थानकाच्या बाजूला दगडं नाही मला महित आहे, तिथे दगडं कुठून आला ब्लॉक उचलून फेकण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांना सगळ माफ आहे. हे लोक तुमच्या घरात घुसण्यासाठी कमी जास्त करणार नाहीत. अशी भयाव परिस्थिती आम्ही कधी पाहिली नव्हती. महाराष्ट्र कोणाचा आहे ते येत्या काळात कळेलच अशा लोकांना फटके मिळाल्या शिवाय कळणार नाही, असंही राणे म्हणाले.

यावेळी बोलताना राणे यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. निलेश राणे म्हणाले, आम्ही कुठे जावं कुठे नाही हे संजय राऊत यांनी सांगणं गरजेचं नाही संजय राऊत यांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावं. अगोदर त्यांनी नगरसेवकांची निवडणूक जिंकून दाखवावी. हा महाराष्ट्र जेवढा त्यांचा तेवढाच आमचा आहे. (Nilesh Rane On Shivsena)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com