
- अभिजीत देशमुख
Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray : अनिल परब (Anil Parab) हा मातोश्रीचा (Matoshree) कारकून आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनिल परब सारखे कारकून लागतात. अनिल परबचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री टू बाकी आहे अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरेंवर केली आहे. दरम्यान ठाकरेंवर टीका करताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे स्वतः काही करू शकत नाही कारण ते नामर्द आहे अशी टिप्पणी केली.
आमदार नितेश राणे हे डोंबिवलीत आले हाेते. या ठिकाणी भाजपाच्या (bjp) वतीने कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सामन्यांसाठी राणे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकाराची संवाद साधताना परब आणि ठाकरेंवर टीका केली.
माध्यम प्रतिनिधींनी राणेंना आज शिवसेना नेते अनिल परब यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांचे घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. किरीट सोमय्या माझ्याबरोबर येणार आहेत का ? मी तर आता जाणारच आहे असा इशारा दिला आहे असा प्रश्न केला. यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले तारीख आणि वेळ कळवावी. आम्ही अनिल पराबांसाठी चहा तयार ठेवतो, अशा सुक्या धमक्या देवू नये. कोर्ट कोर्टाचे काम करेल.
आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. कोणी यावं कुणी जावो. ही काही मातोश्री नाही. त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेबांच्या घरच्या इथे फिरकणार नाहीत अशी आव्हानाची भाषा देखील राणेंनी विराेधकांना केली.
राणे म्हणाले दुसऱ्यांची घरं पाडण्याचे तक्रारी देणारी ही लोकं त्यांच्यासोबत नियती कधी न कधी खेळ करतेच. कधी राणे साहेबांचं घर तोडा, कधी कंगना राणावतचे घर तोडा, कधी दुसऱ्याला अटक करायला लावा असंच त्यांनी केले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची पुन्हा जीभ घसरली. त्यांनी अनिल परब हा मातोश्रीचा कारकून आहे. उद्धव ठाकरेला स्वतःला हिम्मत नाही. कारण तो नामर्द आहे अशी खालच्या पातळीची भाषा राणेंनी वापरली.
दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल तेव्हा दिसेल त्याच्यात पण खूप काही अनधिकृत अशा गोष्टी आहेत. राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्यापुर्वी उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे, त्या बापाच्या घराच्या इथे बघ मातोश्री टू च्या मध्ये नवीन घर तयार झाले. त्यामध्ये शिवसेनेला एन्ट्री नाही. कुठल्याही शिवसेनेच्या शिल्लक सेनेच्या नेत्याला एन्ट्री नाही. तिथे नाही बघू पुढे काय होते असा टोला राणंनी परब यांना लगावला. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.