Nitesh Rane On Uddhav Thackeray: ठाकरेंचं कर्जतमधील फार्महाऊस खोदलं 2000च्या नोटांचा ढिग सापडेल; राणेंचा गंभीर आरोप

युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात येत आहे.
Nitesh Rane On Uddhav Thackeray
Nitesh Rane On Uddhav ThackeraySaam TV

संजय गडदे

Uddhav Thackeray भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं कर्जतमधील फार्महाऊस खोदलं तर तिथे 2000 च्या अनेक नोटा सापडतील, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केल आहे.

संजय राऊत यांनी 2000 रुपयांच्या नोटबंदीवर केलेल्या टीकेनंतर बोलतना नितेश राणे यांनी म्हटलं की, कर्जतच्या फार्म हाऊसमध्ये नेमकं काय आहे? त्या फार्म हाऊसखाली किती 2000 नोटा आहेत?

दोन दिवसांपासून मातोश्रीवर ब्लड प्रेसर मोजण्यासाठी किती लोक येत आहेत, याची माहिती संजय राऊतांनी घ्यावी असं नितशे राणेंनी म्हटलं.

आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा कर्जत फार्म हाउसवरची 2000 ची झाडं मोजा आणि मग टीका करा. कर्जतमधील फार्म हाऊसची सरकारने चौकशी करावी. जमिनीखाली काय आहे ते बघावं लागेल. मी तशी मागणी करणार आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Nitesh Rane On Uddhav Thackeray
Rs 2000 Note Withdrawn: दोन हजाराची नोट चलनातून बाद, आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

उद्धव ठाकरेंनी फुकट कुणालाही काही दिलं नाही

युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत पैसे घेतल्याशिवाय कोणाला काहीही दिलेलं नाही. आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही देखील तेच काम करत आहे, असं आरोपही नितेश राणे यांनी केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com