Mahashivratri 2023: महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ सज्ज, पाेलिसांसह पालिकेची जय्यत तयारी; अवजड वाहनांना बंदी

काेविडचे संकट टळले असून सर्व मंदिरे खूली झाल्याने यंदा महाशिवरात्री धूमधडाक्यात साजरी हाेणार आहे.
Mahashivratri, ambernath
Mahashivratri, ambernathsaam tv

Mahashivratri : अंबरनाथ (ambernath) येथे महाशिवरात्री (mahashivratri) माेठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी माेठ्या संख्येने भाविक अंबरनाथ येथे येत असतात. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस (police) प्रशासन सज्ज झाले आहे.

चार सेक्टरमध्ये ५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार आहेत. दरम्यान महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना (heavy vehicles) अंबरनाथ शहरात बंदी घालण्यात आली आहे. (ambernath mahashivratri marathi news)

Mahashivratri, ambernath
Dehu : तुकाराम महाराज बिजोत्सवापुर्वी इंद्रायणी नदीचा पूल दुरुस्त करा; देहूकरांची मागणी

अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. या एका दिवसात प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक येतात. तर यात्रेमध्ये तब्बल ७ ते ८ लाख यात्रेकरू सहभागी होत असतात.

या यात्रेच्या नियोजनासाठी शिवाजीनगर पोलिसांनी यंदा ४ सेक्टरमध्ये बंदोबस्ताची विभागणी करून विशेष बंदोबस्त लावला आहे. यामध्ये प्राचीन शिवमंदिर परिसर, मंदिराच्या बाहेरचा परिसर, यात्रा परिसर आणि स्वामी समर्थ चौक ते कैलास नगर असे बंदोबस्ताचे ४ सेक्टर असणार आहेत.

या ४ सेक्टर मध्ये २ सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २०० पुरुष पोलीस, ६० महिला पोलीस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, १५० होमगार्ड अशा तब्बल ५०० पेक्षाही जास्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

Mahashivratri, ambernath
Rohit Pawar : डाेळ्यात अंजन घालण्याची गरज, कांद्याच्या दरावरुन राेहित पवारांनी सरकारला फटकारलं

त्याशिवाय पाकीटमारी, पर्स चोरी, छेडछाड होऊ नये यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून या पथकाकडून यात्रेत पेट्रोलिंग केली जाणार आहे. याशिवाय पिपाणी, भोंगे यावर या यात्रेत बंदी असणार असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पथक यात्रेत गस्त घालणार आहे. (Maharashtra News)

पिपाणी आणि भोंगे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. यात्रेत भाविकांना महादेवाचं थेट दर्शन घेता यावं, यासाठी नगरपालिकेकडून ४ ठिकाणी एलईडी स्क्रीन देखील लावली जाणार आहे. त्यावर गाभऱ्यातून थेट प्रक्षेपण केलं जाणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com