मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयारच नाही - देवेंद्र फडणवीस

आज राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयारच नाही - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयारच नाही - देवेंद्र फडणवीसSaam TV

सुशांत सावंत

मुंबई - भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबाबत शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणले की, आज राज्यात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजत आहे. आज जनता होरपळत आहेत. कुणी जनतेचा विचार करत नाही कुणी समस्येचा विचार करत नाही.

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, डिजीटल इंडिया, उद्योगीकरण यावर चर्चा करायचो. मात्र, या सरकारमध्ये चर्चा कशावर होते हरबल तंबाखू, वसूली, स्थगिती यावर चर्चा होते. राज्यातल्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट्र सरकार असे म्हणावे लागेल अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. आज प्रत्येक विभागात वाझे आहे. हजारो कोटींची लूट चालली आहे. पण सामान्य जनतेकडे कुणी बघत नाही. हे कायद्याचे राज्य नाही तर काय ते द्या चे राज्य आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे उतरवणारा प्रस्ताव मांडला आहे. यांचे कितीही कपडे काडले तरी यांना काही फार फरक पडणार नाहीये. आता या सरकारच्या विरोधात आपल्याला एल्गार करून रस्त्यावर उतरावे लागेल. आज देशद्रोह्यांसोबत यांची भागीदारी आहे. भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय नोकरशाहीला लागली तर राज्य पूर्वपदावर येत नाही. कोटी कोटी रुपये देऊन पोलीस अधिकारी पदावर येत आहेत. ही अवस्था आज पहायला मिळत आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. आपल्याला ही लढाई लढली पाहीजे असे देखील फडणवीस यावेळी म्हणले.

मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयारच नाही - देवेंद्र फडणवीस
पुणे म्हाडाच्या 4253 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

कोरोना लसीकरणाविषयी विषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले की, सर्वाधिक लसीकरण करण्यासाठी राज्याला लस कुणी दिली? तर आमचे नरेंद्र मोदी. मोदींनी कधी भेदभाव केला नाही. हेच लोक होते जे लसीकरणाबाबत बोलत होते. पण मोदींनी हे करून दाखवले.राहुल गांधी विदेशी लसीबाबत बोलत होते. पण मोदींनी सर्व यंत्रणा उभ्या केल्यात आणि आज आपल्या देशात देशी लसी तयार झाल्या. मोदींनी यासाठी 21 बैठका मुख्यमंत्र्यांसोबत केल्या. लसीकरण झाले नसते तर आपण एवढे करू शकलो असतो का? आज आपण 100 कोटी लसींचा टप्पा पार केला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com