निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या २७७६ वर; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या २७७६ वर; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठामSaam Tv

निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या २७७६ वर; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

काल एसटीतील २३८ कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत निलंबित कर्मचार्‍यांची संख्या २७७६ इतकी झाली.

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज ११ वा दिवस असून, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. काल आंदोलनाचा 10 वा दिवस असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचा दशक्रिया विधी देखील केला होता. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (Number of suspended ST employees increased to 2776; Insist on staff mergers)

हे देखील पहा -

आतापर्यंत 40 हुन अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान एसटी आंदोलनामुळे आतापर्यंत महामंडळाला 250 ते 300 कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे मात्र सरकार अधिक कठोर होत आहे. काल एसटीतील २३८ कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत निलंबित कर्मचार्‍यांची संख्या २७७६ इतकी झाली.

निलंबित एसटी कर्मचार्‍यांची संख्या २७७६ वर; कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदारांची गाडी पेटवली

एकीकडे एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे विलीनीकरण सध्या स्थितीला शक्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. परिवहन मंत्री अनिल परबही म्हणाले की, याबाबत चर्चा करुनच निर्णय घेता येईल, सरसकट निर्णय घेता येणे शक्य नाही. त्यामुळे हा संप आणखीन चिघळला जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com