नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग
नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग Saam Tv

नालासोपाऱ्यात डॉक्टरकडून परिचारिकेचा विनयभंग

तरुणिने दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.

नालासोपारा पूर्वेकडील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरनेच आपल्या रुग्णालयात काम करीत असलेल्या २१ वर्षीय परीचारीकेसोबत छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास परिचारिका रुग्णालयात झोपली असताना हॉस्पिटलच्या डॉक्टरने नर्सला, तुम मॅच्युअर्ड हो क्या ? आज देखते है तुम मॅच्युअरड हो की नही. असे बोलून तिच्यासोबत विनयभंग केला.

तरुणिने दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, या पीडितेने यापूर्वीही रुग्णालयात असे प्रकार घडल्याची माहिती देत अश्या नराधम डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा सर्व प्रकार नालासोपारा पूर्व संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये घडला आहे. पीडित नर्सच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात जबरदस्तीने विनयभंग ,धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर सुशील मिश्रा असे या आरोपी डॉक्टर चे नाव असून, नालासोपारा मधिल आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनर शिप मध्ये मॅनेजमेंट चे काम पाहत होता. सध्या आरोपी डॉक्टर फरार असून, पुढील तपास तुलिंज पोलीस करत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com