मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसींना बसणार फटका !

महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी असलेल्या ६१ जागांवरील आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. याचा फटका ओबीसींमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटकाSaam Tv

रामनाथ दवणे

मुंबई : सर्वोच्च न्यायलायने Supreme Court ओबीसी आरक्षण रद्द केल्या नंतर मुंबईत ओबीसीला OBC मोठा फटका बसणार आहे. मुंबई महापालिकेची BMC येत्या फेब्रुवारी मधील २०२२ ची निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी असलेल्या ६१ जागांवरील आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. याचा ओबीसींमधून निवडणूक Election लढवणाऱ्या उमेदवारांना फटका बसणार आहे. OBC Community will effect in Mumbai Municipal Corporation elections

हे देखील पहा -

या निवडणुकीत ओबीसींसाठी असलेल्या आरक्षित जागा खुल्या करून निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या जागांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी २२७ जागांमध्ये ५० जागा महिलासांठी राखीव होत्या. तर ६१ जागा ओबीसी समाजासाठी राखीव होत्या. यामध्ये ३१ महिला तर ३० पुरुष अश्या या राखीव जागा होत्या.

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत ओबीसींना बसणार फटका
लातुरात OBC आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दोन आमदार ताब्यात

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील Local self-government bodies ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींची जनगणना Census करून लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या Open करून निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. OBC Community will effect in Mumbai Municipal Corporation elections

२२७ जागांपैकी ६१ जागा ओबीसी जागांना फटका:

मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी असलेल्या ६१ जागांवरील आरक्षण रद्द करून त्या जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. याचा फटका ओबीसींमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना बसणार आहे. तर खुल्या वर्गातील जागा वाढणार असल्याने पुढील निवडणुकीत खुल्या वर्गातील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com