OBC राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप आणि फडणवीस सरकारच: काँग्रेस

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून पुन्हा भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.
OBC राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप आणि फडणवीस सरकारच: काँग्रेस
Devendra Fadnavis, BJP SAAM TV

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भाजपला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीला फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Devendra Fadnavis, BJP
राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सूत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

ओबीसी आरक्षणप्रश्नी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे, त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार असताना, २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लीअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की, आयोग नेमा; परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली. मध्य प्रदेशात जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकरने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपविरोधी (BJP) सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही.

देवेंद्र फडणवीस व भाजप ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत, असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारकडे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतातच, असं पटोले म्हणाले.

Devendra Fadnavis, BJP
भाजपचा सभांचा सपाटा सुरुच; मुंबईत १५ तारखेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार?

मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. या निर्णयाला देशभर भाजपनेच तीव्र विरोध केला होता. हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजप नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भाजपच आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजप आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Edited by - Nandkumar Joshi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.