OBC Resrvation निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव?

ओबीसी आरक्षण बैठक
ओबीसी आरक्षण बैठक- Saam Tv

(रश्मी पुराणिक, साम टिव्ही मुंबई)

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण OBC Resrvation टिकविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचार विनिमय करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव शासनाने या बैठकीत मांडल्याचे सांगण्यात आले. याबाबत निर्णय घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. OBC Reservation Government Meet

काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या मर्यादा ५० टक्क्यांच्या वर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे या समाजात मोठी नाराजी होती. आता यावर मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devedra Fadanavis, प्रवीण दरेकर Pravin Darekar तसेच विनायक मेटे, छगन भुजबळ, सुभाष देसाई, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. OBC Reservation Government Meet

ओबीसी आरक्षण बैठक
BJP- Shisvsena Disute : आमचं भाजपाशी वैचारिक नातं कायम

त्याला मंजूरी मिळाल्यास सरकार याबाबतचा अध्यादेश काढणार आहे. त्यामुळे या निवडणुकांत ओबीसींना आरक्षण देणे शक्य होणार आहे. या अध्यादेशामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण देणे शक्य होणार आहे.. एसी एसटी आरक्षणाला धक्का न लावता उरलेले आरक्षण 50% चाय मर्यादेत ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे आरक्षण देताना एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com