Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटना दुर्दैवी, विरोधकांनी अशा प्रसंगात तरी राजकारण करू नये: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

रेल्वे दुर्घटना दुर्दैवी, विरोधकांनी अशा प्रसंगात तरी राजकारण करू नये: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Coromandel Express Accident
Coromandel Express AccidentSaam Tv

Coromandel Express Accident: बालासोरमधील रेल्वे दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून विरोधकांनी अशा प्रसंगात तरी राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. ठाकूर हे आज उल्हासनगरच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांना रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात असल्याबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बालासोरमध्ये रेल्वे दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जखमींची भेट घेत विचारपूस केली. यानंतर मृत आणि जखमींना रेल्वेकडून, तसंच पंतप्रधानांकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.

Coromandel Express Accident
Samruddhi Mahamarg Accident: चालकाला डुलकी लागली, अन् अनर्थ घडला; समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

मात्र या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जात आहे. याबाबत उल्हासनगरच्या दौरावर असलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विचारलं असता, अशा कठीण प्रसंगात तरी विरोधकांनी राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. (Latest Marathi News)

ही दुर्घटना अतिशय दुःखद असून विरोधकांनी यामध्ये राजकारण करू नये, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

Coromandel Express Accident
Pune Rain News: पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात; नागरिकांची पळापळ, वातावरणात गारवा

दरम्यान, अनुराग ठाकूर हे आज दिवसभर उल्हासनगर शहराच्या दौऱ्यावर असून ते दिवसभरात समाजसेवी संस्था, व्यापारी, नागरिक यांच्याशी संवाद साधणार आहेत. आजच्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी उल्हासनगरमधील संतांच्या दर्शनाने केली. यामध्ये स्वामी शांतीप्रकाश आश्रम, पूज्य चालीया साहेब मंदिर आणि साई वसणशाह दरबार या ठिकाणी भेट देत अनुराग ठाकूर यांनी संतांचं दर्शन घेतलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com